आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90 वर्षांच्या सरुबाईंनी परंपरा जपत केली दिवाळी साजरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूम- शहरातील वीर गल्ली भागात दहा फुटाच्या पत्र्याच्या घरात दोन मतिमंद मुलांसह राहणाऱ्या ९० वर्षांच्या सरुबाई फासे संघर्षातही आनंद शोधून दरवर्षी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करतात.  

सकाळीच सरुबाईंनी आपल्या पत्र्याच्या घरासमोर शेणाचा सडा टाकला. त्यावर सुंदर रांगोळी काढून शेणाच्या गवळणी बनवून दिवाळीचा आनंद साजरा केला. अंगावर फाटकी साडी, अपंग शरीर असूनही सण साजरा करण्यासाठी सरुबाई धडपडत होत्या.  त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांना दरमहा ६०० रुपयांचे निराधार वेतन मिळत असल्याचे समजले. त्यावर त्या दोन मतिमंद मुलांचीही उपजीविका भागवतात. त्यांच्या पत्र्याच्या घराच्या आजूबाजूला झाडे-झुडपे, गवत वाढले आहे. छतावरील पत्र्यांना मोठाली छिद्रे पडली आहेत. त्यामुळे सरुबाईंना राहणेही कठीण झाले आहे.  शहरातील लोकप्रतिनिधी पाच वर्षांतून एकदा येतात आणि १००-२०० रुपये देण्यापलीकडे कोणताही आधार मिळत नसल्याचे सरुबाईंनी सांगितले. डिजिटल शहरांची घोषणा करणाऱ्या शासनाला अशा गरजू, दुबळ्या घटकांचा विसर पडतो, ही शोकांतिका आहे.  
वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी सरसावली तरुणाई : लोकप्रतिनिधी, शासनाला वंचित व दुबळ्यांचा विसर पडला आहे.  परंतु शहरातील तरुणाई सामाजिक भान विसरली नाही. आपण या समाजाचे घटक असून आपलीही काही जबाबदारी आहे, या जाणिवेतून तरुणाईने सुरू केलेल्या सहय्योग संस्थेच्या माध्यमातून रवी माळी, फैजाण काझी, बख्तियार काझी, संदीप बागडे यांनी गुरुवारी (दि.१९) सरूबाई यांच्या घरी पोहोचून त्यांची आपुलकीने विचारपूस केली. त्यांना कपडे आणि फराळासाठी गोडधोड दिले. यावेळी आपली काळजी घेणारे, विचारपूस कुणी आहे, हा विश्वास सरुबाईंना उमेद देऊन गेला .

सूर्यप्रकाशातूनच उजेडाचा आनंद  
^माझ्या घराभोवती दुर्गंधी पसरली असून गवत वाढले आहे. नगरपालिकेने घरात नाही  किमान घरासमोर तरी दिवा लावून प्रकाशाची व्यवस्था करावी. माझी दोन मतिमंद मुलं घरावरील छताला पडलेल्या छिद्रातून येणाऱ्या सूर्याच्या प्रकाशातूनच उजेडाचा आनंद घेतात. कळशीभर पाण्यासाठी गल्लीत फिरावे लागते.  
- सरुबाई पांडुरंग फासे,भूम.
बातम्या आणखी आहेत...