आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षीय चिमुकलीसह दृष्टीहीन महिलेवर बलात्कार, हिंगोलीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
हिंगोली - सेनगाव तालुक्यात एकाच एकाच दिवशी बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत. एका घटनेत ८ वर्षीय बालिकेवर तर दुसऱ्या घटनेत २७ वर्षीय डोळ्यांनी स्पष्ट न दिसणाऱ्या महिलेवर नराधमाने बलात्कार केला आहे.
 
सेनगाव येथील इंदिरा नगर मधील रहिवाशी अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यतीने हे कुकर्म केले आहे. कुल्फी घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या मुलीला, तुझ्या वडिलाने तुला बोलावले आहे व ते हाटेलमध्ये बसलेत असे सांगून अज्ञात आरोपीने मुलीस शहरातील कयाधू नदीच्या काठावरील दाट झाडे असलेल्या जागेत नेले. त्याठिकाणी बालिकेचे तोंड दाबून त्याने तिच्यावर अत्याचार केले. यामध्ये नराधमाने सदर बालिकेच्या गालाचे लचकेही तोडले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.३० ते ५ च्या सुमारास घडली. तर त्याच दिवशी रात्री ९ च्या सुमारास सेनगाव तालुक्यातील पाटोडा येथे २७ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला.
 
सदर पिडीत महिला डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसल्याने घरात बसून होती. त्यावेळी गावातील संजय अंबादास दळवे हा घरात घुसला आणि दरवाजा आतून लावून घेतला. कुकर्म झाल्यावर तो पळून गेला. याबाबत सेनगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर सेनगाव येथील घटनेतील आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. बलात्काराच्या या दोन घटनांनी सेनगाव तालुका हादरून गेला आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...