आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्या, अन्यथा जेल भरो; डॉ. बाबा आढाव यांचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- अधिवेशनाच्या समारोपाला पणनमंत्री व कामगार मंत्री आले नाहीत. सरकारचा दरवाजा बंद आहे. अधिवेशनात पारित केलेल्या ठरावानुसार शासनाला धोरणे बदलण्यासाठी ३० जानेवारीपर्यंची मुदत दिली जाईल. कारण ३० जानेवारीला महात्मा गांधी यांचा स्मृति दिन असून शेतीमालाला हमीभाव व असंघटित कामगारांना पेन्शन लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यावर   ठोस निर्णय न घेतल्यास १  फेब्रुवारीपासून मंत्र्यांच्या गाड्या अडवून जेलभरो आंदोलने होतील, असा इशारा राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला.    


बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी पेन्शन परिषद व राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या २० व्या द्वैवार्षिक अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी डॉ.आढाव बोलत होते.  या वेळी व्यासपीठावर कामगार नेत्या पौर्णिमा चिकरमाने, चंदन, बापूसाहेब मकदूम,  हरीश धुवड, सुभाष लोमटे,   कृउबा सभापती दिनकर कदम, राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस राजकुमार घायाळ आदी उपस्थित होते.


अधिवेशनात आठ ठरावांना मंजुरी
या वेळी कामगार कार्यालयातील रिक्त पदे भरावीत, राज्यातील ५०० शासकीय धान्य गोदामे व १०५ वखार महामंडळातील हमालांच्या पाठीची ठेकेदारी बंद करावी, मालधक्क्यांचे बांधकाम शास्त्रोक्त पद्धतीने करावे, तेथे विश्रामगृह, शौचालयाची व्यवस्था करावी, १२२ प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना ५० व्या वर्षांपासून महिना ३ हजार रुपये पेन्शन सुरू करावी, शेतीमालाला योग्य भाव द्यावा, पणन संचालकांनी १६ डिसेंबर २०१६ रोजी तोलाई कामगारांबाबत काढलेला अन्यायकारक आदेश मागे घ्यावा,  या ठरावांना मंजुरी देण्यात आली.

 

मोदींना पळता भुई झाली थोडी    
पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडे महात्मा गांधींची भजने गात असून मोदींना गुजरातेत पळता भुई थोडी झाली आहे. ते गुजरातमध्ये जास्त वेळ असतात अशी टीकाही अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी  राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. आढाव यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...