आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत सहा दौरे, तरी दुष्काळ कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. लागोपाठच्या दुष्काळाने शेतकऱ्यांना त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. अशा परिस्थितीत मदत जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय पथकाने शुक्रवारी दुष्काळाची पाहणी केली. गेल्या तीन वर्षात सहाव्यांदा हे पथक आले.

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना केंद्रीय पथकाचा दौरा आशेचा किरण वाटतो. ठरलेल्या शेतात पथक येण्यापूर्वीच शेतकरी मोठ्या संख्येने हजर राहतात. आपली कैफीयत कुणीतरी एेकली याचे त्यांना समाधान वाटते. मात्र, प्रत्यक्षात हातात काहीच नाही. दुष्काळी अनुदानाच्या नावाखाली फारच तोकडी रक्कम हाती दिली जाते. दरम्यान, दुष्काळ पाहणीचा फार्स नको. दिल्लीत बसून उपाययोजना केल्या तरी चालतील. परंतु त्या ठोस असाव्यात. दुष्काळाचा अभ्यास करुन त्याचे निवारण करण्यासाठी नियोजन केले जावे. त्यासाठी टास्क फोर्स निर्माण करणे गरजेचे आहे. असल्याचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी उद्धव खेडेकर यांनी सांगितले तर नापिकीमुळे शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत चालला आहे.
त्यामुळे सरसकट कर्जमाफी द्यावी, एकरी ५ हजार रुपये दुष्काळी अनुदान द्यावे, रब्बीचा पिकविमा तातडीने दिला जावा अशी मागणी आमदार राजेश टोपे यांनी केली.