आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड: शिक्षणाधिकारी सविता बिरगेंना 4 लाखांची लाच घेताना पकडले, घराची झडती सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नांदेड  - जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (मा.) सविता बिरगे यांना दोन शिक्षकांचे सेवा खंडातील वेतन काढण्यासाठी चार लाख रुपयांची लाच घेताना शुक्रवारी येथे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात बिरगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

जिल्हा परिषदेतील दोन शिक्षकांचे सेवा खंडातील वेतन काढावयाचे होते. २००६ ते २००८ या कालावधीतील या दोन शिक्षकांचे वेतन व भत्ते मिळून ही रक्कम सहा लाख २२ हजार रुपये व सहा लाख ४९ हजार रुपये अशी होत होती. या रकमेचे बिल काढण्यासाठी शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे (४५) यांनी दोन्ही शिक्षकांना प्रत्येकी दोन लाख असे चार लाख रुपयांची मागणी केली होती. या शिक्षकांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ३० मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बिरगे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ एप्रिल रोजी पडताळणी केली असता बिरगे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर सात एप्रिल रोजी सकाळी सविता बिरगे यांना तक्रारदार शिक्षकांकडून चार लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यानंतर बिरगे यांच्यावर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पथकाने बिरगे यांच्या छत्रपतीनगर येथील घराचीही तपासणी केली.   
 
ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक संजय लाटकर, उपअधीक्षक संजय कुलकर्णी, उत्तम टाक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
 
पुन्हा एकदा जिल्हा परिषद चर्चेत  
जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांनी लाच घेण्याच्या प्रकरणात काही खंड पडताना दिसत नाही. मागील महिन्यात समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनाही लाच घेताना पकडले होते. ही घटना ताजी असतानाच व त्याची चर्चा अद्याप थांबली नसताना पुन्हा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले असल्याने नांदेड जिल्हा परिषदेची नाचक्की होत असून जिल्हा परिषद या अनुषंगाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...