परभणी - सिरपूर (ता. पालम) येथील महिलांनी दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला असून गावातील दारूविक्री पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी करीत जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांना निवेदन दिले आहे. जिल्हा प्रशासनासही महिलांनी निवेदन देऊन दारूविक्री बंद करीत विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे म्हटले आहे.
सिरपूर येथे अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पोलिसांचे दुर्लक्ष नडल्याने गावात दारू सहजरीत्या उपलब्ध होऊ लागल्याने गावातील युवकांसह ग्रामस्थ व्यसनाधीन होऊ लागले आहेत. दारूमुळे घराघरात वितुष्ट निर्माण होऊन भांडण-तंटे वाढले आहेत. तळीरामांकडून महिलांना मारझोड होत असून अनेक संसार उद््ध्वस्त होत आहेत. महिलांना त्रास वाढत असून मुलांचे शिक्षण, आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. मागील १७ डिसेंबर रोजी गावात भांडण झाल्याने महिलांना शिवीगाळ करण्यात आली. त्याचा जाब विचारण्यास गेल्यावर दारूविक्रेत्याने ग्रामस्थांना शिवीगाळ केली. त्यामुळे या दारूविक्रीच्या संदर्भात महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावातून दारू हद्दपार करण्याचा ठराव या महिलांनी घेतला असून गावात दारूविक्रीच न होऊ देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी महिलांनी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलिस अधीक्षक ठाकर यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. गावातील दत्तराव गोविंदराव आवरगंड, बालासाहेब नागोराव बीडकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष व्यंकटराव शेवटे, पोलिस पाटील बापूराव पत्तेवार, सरपंच कल्पना भाऊराव लांडे, उपसरपंच विष्णुकांत आरगंड, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा गौतम हणवते, सदस्या कौशल्याबाई सुधाकर शेवटे, सदस्या पार्वतीबाई भानुदास बचाटे, सदस्य अजय देशमुख, चेअरमन सुधाकर शेवटे, धोंडिबा लांडे, विद्या आवरगंड, मंडोदरी बीडकर, इंदुताई शेवटे, गोदावरी शेवटे, स्वाती शेवटे, प्रीती शेवटे, सावित्रीबाई शेवटे, भारतबाई शेवटे, वच्छलाबाई शेवटे, दीक्षा सुधाकर हणवते, कान्होपात्रा कदम, सरोजा कदम, सुलोचना कदम यांच्यासह गावातील १४० महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.
संसार उद्ध्वस्त
तळीरामांकडून महिलांना मारझोड होत असून अनेक संसार उद््ध्वस्त होत आहेत. महिलांना त्रास वाढत असून मुलांचे शिक्षण, आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. यामुळे महिला आता थेट रस्त्यावर उतरल्या आहेत.
तळीरामांकडून महिलांना मारझोड होत असून अनेक संसार उद््ध्वस्त होत आहेत. महिलांना त्रास वाढत असून मुलांचे शिक्षण, आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. यामुळे महिला आता थेट रस्त्यावर उतरल्या आहेत.