आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम कलाकृती: खजुराहोशी साधर्म्य असलेली शिल्पे वेरूळच्या लेणीमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - खजुराहोतील शिल्पांच्या सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच वेरूळ येथील कैलास लेणीत खजुराहोशी साधर्म्य असलेली शिल्पे कोरली गेलीत, परंतु या चुंबन शिल्पांचा कुठेही उल्लेख आढळत नाही. एकूण ३४ लेणींमध्ये बौद्ध, हिंदू व जैन या तीन प्रकारच्याच शिल्पांचा उल्लेख आहे. वेरूळ शिल्पांची निर्मिती ८ ते १० व्या शतकातील असून खजुराहोची शिल्पे ११ व्या शतकातील असल्याची नोंद आहे.
सोळा नंबरची कैलास लेणी तर उत्तम कलाकृतीचा अप्रतिम नमुना होय. कैलास लेणी ही आठव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत बनवत असताना हिंदू धर्मातील प्रत्येक शिल्पास व कलेस महत्त्व देत अनेक प्रकारची शिल्पे येथे कोरलेली आढळतात. ही शिल्पे धर्म, अर्थ, काम व मोक्ष या संकल्पनेला साजेशा मिथुन शिल्प प्रकारातील असून कामक्रीडेतील विविध आसने दर्शवणारी अनेक कामशिल्पे आढळतात, तर अनेक शिल्पे खंडित झालेली असली तरी पाहताक्षणीच विविधता दिसून येते, तरीही यातून कामसूत्राला थारा न देता मनुष्यप्राण्याचा मोक्ष आदीचा टप्पा कसा असावा हेच या शिल्पातून दर्शवण्यात येते. येथील शिल्पे ८ ते १० व्या शतकातील असून खजुराहोशी साधर्म्य दर्शवणारी आहेत.
ही तर आयुष्याची सत्यता, तुलना नको
^ ही कामशिल्प ही दुसऱ्या टप्प्यातील असून पहिल्या टप्प्यातील शिल्प अजिंठा लेणीत आढळतात, तिसऱ्या टप्प्यातील खजुराहो कोणार्क येथे आढळतात. अजिंठा शिल्पे ६ व्या शतकातील, वेरूळ येथील ८ ते १० व्या शतकातील तर खजुराहो ११ व्या शतकातील आहेत. हे सत्य असले तरी तुलना कामसूत्राशी करू नये.
-आमोद बसवले, पर्यटक मार्गदर्शक
शिल्पे विज्ञानातील अनुकल्पनेशी जोडावी, कामसूत्राशी नव्हे
^कैलास लेणीमध्ये असलेल्या कामशिल्पामध्ये १६ क्रमांकाच्या लेणीत चुंबनाचे प्रकार दर्शवणारे शिल्प आहेत. यातील दोन म्हणजे स्पर्शितक व घटितक या दोन चुंबन शिल्पावर धन्यानेश्वर महाराजांनी दोन ओव्या लिहिल्या असाव्यात. कारण या ओव्यांमध्ये व शिल्पांमध्ये साधर्म्य वाटते तर अशा प्रकारचे शिल्प संपूर्ण देशांमध्ये फक्त वेरूळ लेणीत असून इतर ही कामशिल्प येथे असून ते ठळक दिसत नाहीत. शिल्पांना कामसूत्राशी न जोडता विज्ञानातील अनुकल्पेनेशी जोडत याचा प्रचार व प्रसार अधिकाधिक व्हावा.
-उदयन अनंत इंदूरकर, इंडोलॉजिस्ट
पुढे पाहा, संबंधित फोटो..