आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार हमीवर आता 201 रुपये मजुरी मिळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
परतूर - ग्रामीण भागातील मजुरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रोजगार हमी योजनेच्या रोजंदारीमध्ये ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता रोजगार हमीच्या मजुरांना प्रतिदिवस १९२ ऐवजी २०१ रुपये मजुरी मिळणार आहे. मजुरीचे हे नवीन दर १ एप्रिल २०१७ पासून लागू होणार आहेत. या संबंधी केंद्र शासनाने २८ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेल्या राजपत्रात नोंद करण्यात आली आहे.  

रोजगार हमी कायदा २००५ नुसार ग्रामीण भागात मजुरांना वर्षातील ३६५ दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासन यांच्यात समन्वय साधून नियमावली तयार करण्यात आली आहे. मजुरीचे दर ठरवण्यासाठीदेखील विशिष्ट कार्यपद्धती अवलंबली जाते.  दरवर्षी वेगवेगळ्या राज्यातील महागाई निर्देशांकाचा अभ्यास करून त्यानुसार मजुरीचे दर ठरवले जातात. २०१६ – १७ मध्ये हे दर १९२ रुपये एवढे होते. 
 
१ एप्रिलपासून आता २०१ रुपयांप्रमाणे मजुरीचे नवे दर लागू होणार आहेत, असे परतूरचे
गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...