आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना शहरातील इंदीरानगर भागात अतिक्रमण हटवले, मोठा पोलिस बंदोबस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- शहरातील इंदीरा नगर भागात गुरुवारी सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आली आहे. जालना नगरपालिकेच्या वतीने ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात दुपारपर्यंत ५२ अतिक्रमणे हटविण्यात आली. यात कच्चे घरे,पत्र्याचे शेड,ओटे आदींचा समावेश आहे.
 
 मुक्तेश्वर तलावापासून ते भाग्यनगर उड्डाणपूलापर्यंत १५ मिटरचा डीपी रोड प्रस्तावीत असुन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. गेल्या चार वर्षापासून ही अितक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे मात्र विविध कारणांमुळे हे काम प्रत्येकवळी अर्धवट राहत होते. त्यामुळे काही दिवसातच अतिक्रमणे जैसे थे होत होती. 

दरम्यान गुरुवारी सकाळी पालिका मुख्याधिकारी संतोष खांडेकर,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्या उपस्थितीत ही माेहिम पुन्हा सुरु करण्यात आली. यावेळी जवळपास दीडशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी माेहिम सुरु झाली तेव्हा येथील नागरीकांनी अतिक्रमणांना विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने प्रशासनाने थेट कारवाईला सुरुवात केली. दुपारपर्यंत जवळपास ५२ लहान मोठी अतिक्रमणे हटविण्यात आली होती. काम पूर्ण होईपर्यंत मोहिम सुरुच राहणार असल्याचे पालिकेतील सुत्रांनी सांगीतले. दरम्यान अतिक्रमणे हटविल्यानंतर लगेचच याठिकाणी पक्का रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा तगडा पोलिस बंदोबस्त...
बातम्या आणखी आहेत...