आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंकलेखन परीक्षा केंद्र स्थलांतर, तब्बल 1300 विद्यार्थ्यांची हेळसांड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- शहरासह सोनपेठ येथील टंकलेखन परीक्षा केंद्र स्थलांतरित करण्यात आल्याने तब्बल १३०० विद्यार्थ्यांची हेळसांड झाली आहे. याप्रकरणी अखिल भारतीय युवा फेडरेशनच्या वतीने मंगळवारी (दि. तीन) येथील शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयास घेराव घालण्यात आला. केंद्र स्थलांतरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने या वेळी केली.
  
जिल्ह्यातील टंकलेखन परीक्षेतील अनागोंदी व गैरप्रकार तसेच आर्थिक हितसंबंधाच्या बाबतीत युवा फेडरेशनने सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. विविध मार्गांनी आंदोलने केली आहेत. या आंदोलनांमुळे एक डिसेंबर २०१५ रोजी टंकलेखन परीक्षेतील गैरप्रकारांप्रकरणी ८ दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईदेखील झाली. परंतु काही अधिकाऱ्यांनी आर्थिक लाभासाठी परभणी शहर व सोनपेठ येथील परीक्षा केंद्र जाणीवपूर्वक पूर्णा येथे स्थलांतरित केले. त्यामुळे १३०० विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...