आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी मातेची महिषासुरमर्दिनी पूजा, आज धार्मिक विधीने होणार नवरात्रोत्सवाची सांगता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर  - कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची महिषासुरमर्दिनीच्या रूपातील पूजा बुधवारी(दि.११) मांडण्यात आली होती. महिषासुराचा वध करणाऱ्या रूपात मातेचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, गुरुवारी शाकंभरी पौर्णिमेदिनी होमात धार्मिक विधी होऊन नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.  

शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त बुधवारी सकाळच्या अभिषेक पूजेनंतर देवीची महिषासुरमर्दिनी पूजा मांडण्यात आली. पूजेचे मानकरी बाळकृष्ण कदम, शशिकांत पाटील, अतुल मलबा, पृथ्वीराज मलबा आदींनी पूजा मांडली. त्यानंतर धूपारती होऊन देवीचा अंगारा काढण्यात आला. सायंकाळच्या अभिषेक पूजेपर्यंत तुळजाभवानीचे महिषासुरमर्दिनी रूप भाविकांसाठी खुले होते. तत्पूर्वी पहाटे पाच वाजता चरणतीर्थ पूजेनंतर मंदिर देवीदर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले होते. सकाळी ७ वाजता अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला. या वेळी पुजारी मंडळाच्या वतीने तुळजाभवानीला सिंहासन पूजा घालण्यात ली. या वेळी माजी नगरसेवक अविनाश गंगणे यांच्यासह शरद रोचकरी, संजय धुमाळ, नानासाहेब टो, शहाजी भांजी, प्रशांत छत्रे, नीलेश टोले आदी पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री १० वाजता देवीची छबिना मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, बुधवारी सकाळी १० वा. यजमान महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते गणेश ओवरीत शतचंडी यज्ञास प्रारंभ करण्यात अाला.