आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेच्या उपचारासाठी अाठ लाखांचे कर्ज ; शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती  - सुनेच्या गंभीर आजारावर उपचार करताना डोक्यावर सुमारे आठ लाख रुपये कर्जाचा बोजा झाल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन अात्महत्या केली. ही घटना मंगळवारी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे घडली. काशीनाथ सिधू हिवरकर असे मृताचे नाव अाहे.   

हिवरकर यांची सून साधना (३०) यांना सांधेदुखीच्या अाजाराने ग्रासले हाेते. त्यामुळे हिवरकर कुटुंबीयांचा तिच्या उपचारासाठी माेठा खर्च हाेत हाेता. २००९ मध्ये काशीनाथ यांनी गावातील सहकारी साेसायटीकडून त्यासाठी कर्जही घेतले हाेते, मात्र त्याची परतफेड करता अाली नाही. तसेच खासगी व्यक्तींकडूनही सुमारे ६ लाखांवर कर्ज त्यांनी घेतले हाेते. हे कर्ज व व्याजाचा अाठ लाखांचा बाेजा कसा उतरणार या चिंतेत काशीनाथ हे सतत हाेते. मंगळवारी रात्री साडेअाठ वाजेच्या सुमारास काशीनाथ व त्यांची पत्नी सुलाबाई गावाशेजारील गोठ्याकडे झोपायला गेली. पत्नी झाेपल्यानंतर काशीनाथ यांनी रात्री गोठ्याच्या आढ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली अाहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...