आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबार पेरणीच्या धास्तीने शेतकऱ्याची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बनोटी - वडिलांच्या डोक्यावर आधीच सोसायटी व बँकेचे कर्ज आणि आता दुबार पेरणीचे संकट समोर उभे ठाकलेले असल्याने बनोटी-पाचोरा मार्गावर असलेल्या निंभोरा येथील युवा शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली.
 
जिजाबराव भगवान पाटील (२३) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी सकाळी जिजाबराव शेतात फेरफटका मारायला  गेला होता. काही वेळानंतर मजूर शेतात कामावर गेले असता जिजाबराव बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्यांनी त्याला उपचारासाठी जळगाव जिल्ह्यतील पाचोरा येथील  शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अमित साळुंखे यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...