आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली: जमीन बळकावणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
हिंगोली - सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील शेतकऱ्याची जमीन केवळ ८ हजार रुपयांमध्ये बळकावणाऱ्या रिसोड तालुक्यातील हराळ येथील सावकारावर येथील शहर पोलिस ठाण्यात सहकार अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.  
 
बळीराम महादजी बिल्लारी (रा. हराळ, ता. रिसोड, जि. वाशीम) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी दत्ताराव  हराळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजी तुकाराम वाठोरे (रा. म्हळशी, ता. सेनगाव) यांची शेती सावकाराने हडप केली आहे. सावकाराकडे व्याजाने पैसे वाटप करण्याचा कोणताही परवाना नसताना त्याने शिवाजी वाठोरे यांना ८ हजार रुपये १० टक्के प्रतिमहा दराने व्याजाने दिले आणि रक्कम वाढल्यावर अगोदरच लिहून घेतलेली ८० आर शेती बळकावली. परंतु ही शेती (गट क्र. ४०) सामायिक क्षेत्र असलेल्या २ हेक्टर ६३ आरमधील भाग होता आणि जमीन आपल्या नावावर करून घेताना सावकार बिल्लारी याने शिवाजी वाठोरे यांच्या भावाची संमती घेतली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. शिवाजी वाठोरे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली होती.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...