आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवी कर्जमाफी : मल्ल्याचे मुखवटे घालून 30 शेतकऱ्यांचे आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - उद्योगपती विजय मल्ल्याला बँका कोट्यवधी रुपयांचे कर्ज देतात; परंतु शेतकऱ्यांना साधे ५० हजारांचे कर्ज मिळत नाही. जुलै उलटला तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नाही.  शेतकऱ्यांच्या भावना बँकांना कळाव्यात म्हणून गेवराई येथील भारतीय स्टेट बँकेसमोर बुधवारी दुपारी १२ वा. मनसेच्या नेतृत्वाखाली ३० शेतकऱ्यांनी विजय मल्ल्याचे मुखवटे घालत घोषणाबाजी करून आंदोलन केले.
 
नव्या कर्जमाफीमुळे यंदा  जुलै महिना उलटला तरीही   शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले गेले  नाही.  विजय मल्ल्या, रत्नाकर गुट्टेसारख्या बड्या उद्योगपतींना बँका कर्ज देतात; परंतु शेतकऱ्यांना साधे पन्नास हजार रुपयांचेही    कर्ज दिले जात नाही. शेतकऱ्यांच्या भावना बँकेला  कळाव्यात म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या नेतृत्वाखाली  मंगळवारी दुपारी बारा वाजता शहरातील जुन्या बसस्थानकाजवळील  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या  शाखेसमोर मनसेचे कार्यकर्ते व शेतकरी एकत्र आले. बँकांनी शेतकऱ्यांना   पीक कर्ज वाटप करावे, सरसकट कर्जमाफी द्यावी,  अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलकांतील  ३० शेतकऱ्यांनी विजय मल्ल्याचे मुखवटे घालून  आंदोलन केले. हे आंदोलन पाहून  शाखा व्यवस्थापक  दौंड  हे आंदोलनस्थळी आले. त्यांना  शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, गणेश पवार,  अशोक नरवडे, पप्पू वखरे, किरण बेदरे, शिवदास राठोड, मोहन तौर,  माउली तौर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
 
या आंदोलनाने तरी दया येईल   
-एकीकडे उद्योगपती विजय मल्ल्या यांना बँका करोडो रुपयांचे कर्ज देतात; परंतु शेतकऱ्यांना  कर्ज मिळत नाही. या प्रकाराच्या निषेधार्थ हे आंदेालन करण्यात आले. विजय मल्ल्याचा मुखवटा पाहून तरी बँकेला दया येईल व बँक शेतकऱ्यांना कर्ज देईल यासाठी बुधवारी हे आंदोलन करण्यात आले.
राजेंद्र मोटे, जिल्हाध्यक्ष, मनसे
बातम्या आणखी आहेत...