आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्ल्यावरून उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या, परळी तालुक्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मापुरी- कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील पुरातन किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (४ मे) घडली. पांडुरंग धोंडिबा फड  (५०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  

परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील शेतकरी पांडुरंग धोंडिबा फड यांना गावात साडेचार एकर शेती आहे. यातील दीड एकर शेती बागायती आहे. शेतीसाठी त्यांनी गावातील महाराष्ट्र 
ग्रामीण बँकेच्या शाखेतून स्वत: व पत्नीच्या नावे १ लाख ४० हजार रुपये, तर जिल्हा मध्यवर्ती बँक सोसायटीकडून ४०  हजारांचे कर्ज काढले होते. शेतीत काही पीक नसल्याने ते हतबल झाले होते. याच नैराश्यातून पांडुरंग फड हे ४ मे रोजी पहाटे पाच वाजता घराबाहेर पडले.  गावालगत दक्षिण दिशेस असलेल्या उंच किल्ल्यावरून त्यांनी उडी मारली. यात त्यांचा मृत्यू झाला. 
बातम्या आणखी आहेत...