आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर: बापलेकाचा खून; 5 दोषींना शुक्रवारी होणार शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे आठ वर्षांपूर्वी क्षुल्लक कारणावरून बापलेकाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवले असून आरोपींना १० मार्च रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.  

पानगाव येथे २६ डिसेंबर २००८ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गावातील भागुराम नारायण पेद्दे (४५) आणि  बालाजी भागुराम पेद्दे (२३) या बापलेकांचा शौचास बसल्याच्या कारणावरून विशिष्ट समाजाच्या लोकांनी खून केला होता. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी वेळअमावास्या असल्याने या घटनेवरून गावात जातीय तणावही निर्माण झाला होता.  
 
पोलिसांनी ५१ जणांवर दोषारोपपत्र दाखल केले होते. ५१ पैकी दोन बालगुन्हेगार होते. न्यायाधीशांनी पाच जणांना दोषी ठरवले. त्यात नसीर उस्मान पठाण, बशिरोद्दीन ऊर्फ मुन्ना नसीरोद्दीन काझी ऊर्फ सिद्दिकी, शेख मुनीर शेख नूर, फिरोज रहीमखान पठाण आणि युनूस या पाच जणांचा समावेश आहे. उर्वरित ४६ जण संशयाचा फायदा घेऊन निर्दोष सुटले. या प्रकरणातील नसीर पठाण व बसिरोद्दीन काझी हे दोघे घटना घडल्यापासून कारागृहातच तर मुनीर शेख व फिरोज पठाण जामिनावर होते. 
बातम्या आणखी आहेत...