आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लिंग बदलाच्या निर्णयावर बीडची महिला पोलिस ठाम, नियमांना देणार काेर्टात अाव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव / बीड- शरीरात होणाऱ्या बदलांमुळे लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्यासाठी पोलिस महासंचालकांकडे अर्ज केलेल्या बीड जिल्हा पोलिस दलातील त्या महिला पोलिसाला महासंचालकांनी परवानगी नाकारल्यानंतर तिने आता न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, आतापर्यंत माध्यमांसमोर न आलेल्या महिला पोलिसाशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला.      


लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी अर्ज केल्यानंतर चर्चेत आलेली ती महिला पोलिस मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आवश्यक चाचण्यांमध्ये व्यग्र आहे. आतापर्यंत ती माध्यमांसमोर आली नव्हती. पोलिस महासंचालकांनी तिला शस्त्रक्रियेस परवानगी नाकारल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने तिच्याशी संवाद साधला. ‘मी लिंग बदलाच्या निर्णयावर ठाम असून नोकरी टिकवण्यासाठीही मी प्रयत्न करणार असल्याचे तिने सांगितले’. दरम्यान, महासंचालकांनी परवानगी नाकारली असली तरी न्यायालयाकडे आपण अर्ज केला असून  निकालानुसार पुढील प्रक्रिया होईल. दरम्यान, या सगळ्या प्रक्रियेत माझे कुटुंब माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी संपूर्ण चर्चेनंतरच मी हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. एजाज नक्वी यांच्यामार्फत सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. लिंगाधारित नियमावली चुकीची अाहे. ट्रान्सजेंडर नागरिकांना यात जागा नाही पोलिस भरतीची ही नियमावली चूकीची असून याला आता न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती अॅड. नक्वी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...