आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआय एटीएमला आग; दुर्घटना टळली, बारा लाखांचे नुकसान, धुरामुळे वाजले सायरन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- शुक्रवारी सकाळी ८ वाजता शिवाजी पुतळा परिसरातील अंबर हॉटेलजवळील एसबीआयच्या एटीएममध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. धूर निघाल्यानंतर सायरन वाजू लागल्यामुळे परिसर तसेच एटीएम बिल्डिंगवरील रहिवाशांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवल्यामुळे  पथकाने ताबडतोब येऊन आग आटोक्यात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.  

या आगीत दोन एसी, सहा बॅटऱ्या, फर्निचर असे एकूण बारा लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने सीडीएम, एटीएम मशीन जळाली नाही. नसता मोठ्या प्रमाणात नोटाही जळाल्या असत्या. 
बातम्या आणखी आहेत...