आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यातही तेर शिवारात बहरली गलांडाची फुलशेती; तरुणाचा वेगळा प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेर- पारंपरिक शेतीला फाटा देऊन उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तरुणाने अवघ्या १० गुंठा जमिनीत गलांडा जातीच्या (शेवंती) फुलांची लागवड केली. सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यातही ही फुलशेती चांगलीच बहरल्याने पिवळ्या मखमली चादरीचे आच्छादन अंथरल्याचा भास होत आहे. या फुलांच्या तोडणीतून आतापर्यंत तरुणाला १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

तेर येथील वैभव काकासाहेब डिगे या तरुण शेतकऱ्याने जानेवारी महिन्यात १० गुंठे फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. लागवडीसाठी गलांडा (शेवंती) या फुलांची निवड केली. पाखर सांगवी (ता. लातूर) येथून ६०० रुपयांत एक वाफलीप्रमाणे वाफली रोपे आणली. विहिरीच्या उपलब्ध पाण्याचे नियोजन करून या रोपांची १० गुंठ्यांमध्ये फुटांवर एक सरी या पद्धतीने ५० फूट लांबीच्या १० सऱ्या टाकून रोपांची जानेवारी २०१७ मध्ये लागवड केली. वैभव यांना तोडीतून आतापर्यंत १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आणखी ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या फुलांना सध्या लग्नसराईमुळे चांगली मागणी आहे. 

साधारणत: २५ रुपये किलो या दराने ही फुले विकली जात आहेत. उस्मानाबाद, मुरुड, ढोकी या स्थानिक बाजारपेठेत ही फुले विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. एकीकडे १०-१० एकर शेती असूनही कांहीच पिकत नसल्याची ओरड करणाऱ्यांची संख्या कमी नाही. परंतु, वैभव डिगे यांनी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देऊन, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून, अवघ्या १० गुंठ्यांमध्ये केलेला हा फुलशेतीचा यशस्वी प्रयाेग तरुण शेतकऱ्यांसाठी नक्कीच पथदर्शी आहे. 

पारंपरिक शेतीलापर्याय म्हणून कमी पाण्यात फुल शेतीचा पर्याय निवडला. यावर्षी १० गुंठ्यांमध्ये हा प्रयाेग केला असून याला चांगले यश मिळत असल्याने पुढे यामध्ये २० गुंठ्यांची वाढ करणार आहे. शेवंतीच्या फुलाला बाराही महिने चांगली मागणी आहे. 
- वैभवडिगे, प्रयोगशील तरुण शेतकरी. 
बातम्या आणखी आहेत...