आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवणातून १५० जणांना विषबाधा, धारूर तालुक्‍यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर - द्वादशीच्या जेवणातून दीडशे जणांना विषबाधा झाल्याची घटना धारूर तालुक्यातील आम्ला येथे सोमवारी दुपारी घडली. विषबाधा झालेल्यांना मोहखेड, सिरसाळा, अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धारूर, पाथरूड येथील डॉक्टरांचे पथक मोहखेड येथे रात्री दाखल झाले होते.

धारूर तालुक्यातील आम्ला येथे तीन दिवसांपासून हरिनाम सप्ताह सुरू आहे. सप्ताहादरम्यान रोज गावातील एक जणाकडे जेवणाची पंगत असते. सोमवारी व्दादशीच्या दिवशी धोंडीराम गिन्यानदेव सोळंके यांची पंगत होती. सकाळी ९ ते १० च्या दरम्यान जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. ज्वारीची भाकरी, वरण,भात असा मेन्यू जेवणासाठी होता. जेवणानंतर एक ते दोन तासांनी काही जणांना मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला. नंतर अनेकांना हा त्रास सुरू झाल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचे लक्षात अाले.

सिरसाळ्यात रुग्ण
या प्रकारानंतर सिरसाळा, मोहखेड येथील रुग्णालयांमधून रुग्णवाहिका बाेलावण्यात आल्या. काही जणांना सिरसाळा,मोहखेड,येथे हलविण्यात आले. काहींना अंबाजोगाई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. काही परळी येथे खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाल्याने अनेकांना जमिनीवर झाेपून उपचार घ्यावे लागले.
बातम्या आणखी आहेत...