आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात दारूबंदीसाठी अांदाेलन : तृप्ती देसाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - मंदिरात महिलांना प्रवेश मिळवून देण्याचे अांदाेलन यशस्वी केल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अाता राज्य दारूमुक्त करण्यासाठी नवीन अांदाेलन हाती घेणार अाहेत. दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद‌्ध्वस्त हाेत अाहेत. तरुण महिला विधवा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केवळ गाव किंवा जिल्हा दारूमुक्त करून चालणार नाही तर संपूर्ण राज्यात दारूबंदी झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी रविवारी शिर्डीत पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केली. 

या पार्श्वभूमीवर साेमवारी काेपरगाव शहरातून दारूविराेधी जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.   
 
शिर्डी, शनिशिंगणापूर यासारख्या तीर्थक्षेत्री देश-विदेशातून भक्त येत असतात. मात्र या ठिकाणी अवैधरीत्या दारूविक्री केली जाते. येथील देवस्थान संस्थानने अाधी पुढाकार घेऊन दारूबंदी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तीर्थक्षेत्राजवळील दारूबंदी करण्याचा तातडीने जीआर काढला पाहिजे. सर्वाेच्च न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटरच्या अात दारूविक्रीस मनाई केली अाहे. मात्र तरीही दारूविक्री हाेते, हे गृहखात्याचे अपयश अाहे, अशी टीकाही देसाई यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...