आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी वकिलास सोळा लाखांचा गंडा, बीडमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
बीड - कोर्ट स्टॅम्प फीससाठी चलन भरायला पैसे घेऊन काेर्ट स्टॅम्प न देता सरकारी वकिलाला १६ लाख रुपयांना फसवल्याची घटना बीडमध्ये घडली. 

सरकारी वकील अजय श्रीमंत तांदळे यांनी व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी कोर्ट स्टॅम्प फीचे चलन भरण्यासाठी अजय ब्रिजमोहन सोनी याच्याकडे १६ लाख ९५ हजार ८०० रुपये १४ मार्च २०१७ रोजी दिले होते. सोनी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामोर सोनी कॉम्प्युटर्स नावाचे दुकान आहे. यातून  तो हा व्यवहार करत होता. तांदळे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून पैसे घेऊनही कोर्ट स्टॅम्प न दिल्याने अखेर अॅड. अजय तांदळे यांनी शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अजय ब्रिजमोहन सोनी, संजय ब्रिजमोहन सोनी, बालाप्रसाद गुलाबचंद तोष्णीवाल व कोशागार कार्यालयातील कारकून नागरगोजे  यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
बातम्या आणखी आहेत...