आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीची छेडछाड केली म्हणून वेटर मित्राचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- प्रेयसीची छेडछाड केल्याप्रकरणी वेटर मित्राचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केल्याची घटना गेवराई शहरातील चार्वाक बिअरबारमध्ये घडली. पोलिसांनी एकास अटक केली असून दुसरा फरार झाला आहे.

शिरूर तालुक्यातील माळेगाव येथील संतोष बाबूराव दहिवाळ (४०) हा गेवराई शहरातील जालना रोडवरील चावार्क बिअरबारमध्ये वेटरचे काम करत होता. ५ ऑगस्टला मध्यरात्री रूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता. हॉटेल मालक दिनेश घोडके यांनी गेवराई पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. चार्वाक बिअरबारवर अनिल शिवाजी आतकरे, शिवकुमार ऊर्फ कृष्णा अशोक काशीद हे दोघे वेटर म्हणून काम करत होते. अनिलच्या प्रेयसीची तू छेड का काढली या कारणावरून बुधवारी रात्री दोघांनी संतोष याला शिवीगाळ केली म्हणून लाकडी दांड्याने मारहाण केली. जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पोलिस तपासात खुनाचा हा प्रकार उघडकीस आल्यांनतर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...