आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्या लोकांची "बडी सडक', 1 किमी मार्गावर 20 गणेश मंडळे 40 मीटर अंतरावर एका मंडळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना-जालना शहरात ६९ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. सुरुवातीला संपूर्ण शहराचे एकच गणेश मंडळ होते. शहरातील धनिकांचे वास्तव्य असलेल्या बडी सडक या एक किलोमीटर रस्त्यावर तब्बल २५ गणेश मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली असून 
प्रत्येक मंडळाची गणेशमूर्ती आकर्षक आणि भव्यदिव्य आहे.

शहरातील कादराबाद भागात ६९ वर्षांपूर्वी नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला.  आता शहरात ४५० हून अधिक गणेश मंडळे आहेत. शहरातील बडी सडक या एक किलोमीटरच्या रस्त्यावर तर तब्बल २५ गणेश मंडळे आहेत. खरे तर पालिकेच्या रेकॉर्डनुसार या रस्त्याचे नाव आर.पी.रोड (राजेंद्र प्रसाद मार्ग ) आहे, मात्र शहरातील प्रमुख  बडे उद्योजक, व्यापारी यांचे वास्तव्य असल्याने हा रस्ता ‘बडी सडक’ याच नावाने ओळखला जातो.  यावर्षी प्रथमच नोंदणी केलेली चार गणेश मंडळे आहेत तर ७ ते १० वर्षे पूर्ण होत असलेली १० गणेश मंडळे आहेत. १० वर्षाहून अधिक वर्ष पूर्ण केलेली ८ गणेशमंडळ या रस्त्यावर आहेत. बहुतांश गणेशमूर्ती मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून आणण्यात आल्या आहेत. ५ फुटांपासून ते १६ फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती बसविण्यात आल्या आहेत.
 
५० फुटांवर चार गणेश मंडळे
या रस्त्यावरील ज्योती गणेश मंडळ  सर्वात जुन्या मंडळांपैकी एक. याच मंडळापासून ५० फुटांवर चार गणेश मंडळे आहेत. यातील शिवरुद्र गणेश मंडळाचे हे पहिले तरओम गणेश मंडळाचे दुसरे  तर चिंतामणी गणेश मंडळाचे हे पाचवे वर्ष अाहे. बडी सडकवर गेली अनेक वर्षे गणेश मंडळांकडून अन्नदानाचा कार्यक्रम होतो.
 
दु:ख विसरून बाप्पांच्या कृपेची आस
लय भारी देवांशू गणेश मंडळाने पाच फुटाच्या बाहुबली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे.  या मंडळाचा अध्यक्ष देवांशू  टिकारिया हा १३ वर्षाचा बालक आहे. तो मस्क्युलर डिस्ट्रॉफी या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. यात शरीराचे एकेक अवयव टप्या-टप्प्याने निकामी होतात. देवांशू चे पाय आता काम करीत नसल्याने तो स्वत: उभा राहू शकत नाही.
 
बातम्या आणखी आहेत...