आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळीत हंगामासाठी सहकार्य करा : बंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- येथील सहकारी साखर कारखाना पुढील वर्षी सुरू करण्याच्या दृष्टीने नवीन संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी येणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन तथा आमदार प्रशांत बंब यांनी केले. ते कारखान्याच्या आयोजित वार्षिक सभेत बोलत होते.

या वेळी लासूर बाजार समितीचे कृष्णा पा. डोणगावकर, माजी चेअरमन कैलास पाटील, संजय जाधव, नंदकुमार गांधिले, व्हाइस चेअरमन लक्ष्मणराव भुसारे उपस्थित होते. बंब यांनी कारखाना सुरू करण्यासाठी असलेल्या कायदेशीर, तांत्रिक व आर्थिक अडचणींची माहिती उपस्थित सभासदांना दिली. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून कारखाना सुरू करण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या काही महत्त्वाच्या निर्णयासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. डोणगावकर म्हणाले की, निवडणुकीच्या काळात सभासदांना कारखाना भाडेतत्त्वावर देणार नाही. कारखान्याची जमीन विकणार नाही, स्व:बळावर कारखाना चालवू, असे आश्वासन आमदार बंब यांनी दिले होते. पण, आश्वासनापासून दूर जात असल्याचे संकेत आजच्या बोलण्यातून मिळत असल्याचा आरोप करत कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कैलास
पाटील यांनी या वेळी सभासदांना त्यांचे मत मांडू देण्याची मागणी करून कारखाना सुरू करण्याची तयारी दर्शवली.