आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगावाडी शिवारातील घरावर दरोडा; पाच जणांना मारहाण, दोघे गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई तालुक्यातील गंगावाडी शिवारात दरोडेखोरांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.   - Divya Marathi
गेवराई तालुक्यातील गंगावाडी शिवारात दरोडेखोरांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.  
गेवराई - तीन दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्याचा छडा लागत नाही तोच गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे शेतातील एका घरावर सोमवारी पहाटे तीन वाजता  सहा दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत पाच जणांना मारहाण केली. यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६८ हजार रुपयांचा एेवज लांबवला आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या पाच जणांपैकी दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.   

तालुक्यातील  राक्षसभुवन  रस्त्यावरील गंगावाडी येथील शेतकरी  जगदीश लांडगे चार-पाच  वर्षांपासून पत्र्याच्या घरात राहतात.  रविवार, ५ मार्च रोजी  रात्री जगदीश लांडगे, रुक्मिणबाई लांडगे , शांताबाई लांडगे व संभाजी हिंगे त्यांच्या घराबाहेर  झोपले होते. घरात मुलगा धनंजय लांडगे व त्यांची पत्नी सोनाली होते. सोमवारी  पहाटे  तीन  वाजता सहा दरोडेखोरांनी घराबाहेर झोपलेले  जगदीश लांडगे (५५), रुक्मिणबाई (५०) शांताबाई (७०), संभाजी हिंगे  यांना टॉमीने जबर मारहाण केली. या मारहाणीच्या वेळी दरोडेखोरांनी तिघांनाही जागेवरच शांत पडून राहा, असे म्हणत धमकावले. यानंतर दरोडेखोरांनी घराचा लाकडी दरवाजा  तोडून घरात प्रवेश  केला. या वेळी घरात येण्यास  विरोध करणाऱ्या धनंजय लांडगे  याच्यावरही चाकूहल्ला केला. घरातील तीन तोळ्यांची  दोन मंगळसूत्रे, एक मोबाइल  असा ६८ हजार रुपयांचा ऐवज लांबवला.
 
 याप्रकरणी धनंजय लांडगे यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलिस ठाण्यात दरोड्याचा  गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, सहायक पोलिस अधीक्षक नुरुल हसन, वैभव कुलबुर्म, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार चाफेकर,  पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्यासह दरोडा प्रतिबंधक पथक, स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.  

लग्नात आलेले दागिनेही चोरीस  : १६ फेब्रुवारी २०१७  रोजी धनंजयचा विवाह झाला होता. या लग्नात  आलेले दागिने दरोडेखोरांनी लांबवले.  दरोड्याच्या तपासासाठी गेवराई पोलिस ठाण्याची तीन, चकलांबा व  तलवाडा ठाण्याचे प्रत्येकी दोन, एलसीबीचे  एक अशी सहा पथके  नेमली आहेत.   

तीन दिवसांत दुसरा दरोडा : गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव रस्त्यावरील काळेवस्ती व वीर वस्त्यावर १० मार्च २०१७ रोजी मध्यरात्री एक वाजता सहा दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख रुपयांचा एेवज लांबवला होता. दरोडेखोरांनी मनीषा काळेसह अभिजित काळे व भगवान पांडुरंग वीर यांना मारहाण केली. या दरोड्याच्या तपासासाठी तीन पथके  मागावर असून कुठलाही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
 
गंभीर जखमींवर बीडमध्ये उपचार   
गंगावाडीत  दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत रुक्मिणबाई, जगदीश हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आले अाहे. यातील शांताबाई लांडगे व धनंजय यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.   
 
पुढच्या स्लाईडवर पाहा,  जखमीेंचे फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...