आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा, खान्देशात गारपीट, अवकाळी पावसाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड/ जळगाव- बंगालच्या उपसागरात चेन्नई आणि पाँडिचेरीच्या दरम्यान चक्रवाताची स्थिती निर्माण झाल्याने तसेच लक्षद्वीप लगतच्या समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रावर अाल्याने राज्यावर अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. दोन दिवसांत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज एमजीएम खगोलशास्त्र अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औँधकर यांनी शनिवारी व्यक्त केला.

तीन जिल्ह्यांत पाऊस
औरंगाबादजिल्ह्यातील गंगापूर शहरात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता तुरळक पाऊस झाला. बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातील काकडहिरा आणि दासखेड भागात, बीड आष्टी तालुक्यातील अनेक गावांत तसेच लातूर, अहमदपूर उदगीर शहरातही रिमझिम पाऊस झाला.