आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसात मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; तालुक्यात२५ ग्रामपंचायतीं साठी झाले मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यात२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका दोन पोट ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. परंतु सकाळपासूनच पावसाने तालुकाभरात हजेरी लावली. त्यामुळे मतदान प्रक्रियावर थोडाफार परिणाम दिसून आला, पण अनेकांनी भरपावसात आपला मतदानाचा हक्क बजावला.

दिवसभर झालेल्या पावसाने उमेदवारांची मतदारांना केंद्रापर्यंत आणता आणता चांगलीच धावपळ उडाल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. या निवडणुकीत ५० हजार ४३८ मतदारांपैकी ४२,०६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर उर्वरित ८,३७२ मतदारांनी मतदानांकडे पाठ फिरवली आहे. तालुक्यातील ५७९ उमेदवारांचे भवितव्य सायंकाळी मतदान पेटीत बंद झाले. आता मत मोजणी ऑगस्ट रोजी असल्याने त्याकडे सर्व मतदारांच्या नजरा लागल्या आहेत.
खुलताबाद तालुक्यात कसाबखेडा, गल्ले बोरगाव, बाजारसावंगी, वेरूळ, राजेराय, पळसवाडी, वडोद बु., मावसाळा, कागजीपुरा, पिंप्री, बोडखा, झरी, सराई, भडजी, खांडी पिंपळगाव, सुलतानपूर, धामणगाव, निरगुडी, म्हैसमाळ, गदाना, सोनखेडा, कनकशीळ, ताजनापूर, खिर्डी, गोळेगाव या २५ ग्रामपंचायतींसह शूलिभंजन कानडगाव या दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी जवळपास ५९७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यापैकी १८ उमेदवारांसमोर कोणताही अर्ज नसल्याने ते बिनिवरोध झाले. तर मंगळवारी ५७९ उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...