आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड: पाच हजार क्षमतेच्या गुरुद्वारा लंगर हॉलचे उद्या उद्घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- सचखंड हुजूरसाहिब गुरुद्वारात मुख्य लंगरच्या शेजारी नव्याने बांधलेल्या लंगर हॉलचे  उद्घाटन ११ मार्च रोजी दुपारी साडेअकरा वाजता संत बाबा कुलवंतसिंगजी यांच्या हस्ते होणार आहे.
 
गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हॉलची निर्मिती गुरुद्वारा लंगरसाहिबचे मुख्य जत्थेदार संतबाबा नरेंद्रसिंगजी, संतबाबा बलविंदरसिंगजी यांच्या संयुक्त विद्यमाने कारसेवेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हॉलची रुंदी ९० फूट असून लांबी १५० फूट एवढी आहे. या हॉलमध्ये चपात्या करण्याची स्वयंचलित मशीन बसवली आहे.
 
- ५००० भाविक लंगरमध्ये दररोज जेवतात
- ३००० भाविक यापूर्वीच्या हॉलमध्ये जेवत
- २४ तास लंगरसेवा
बातम्या आणखी आहेत...