Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» News About Handicapped Chauranginath Lokhande

जालना: हात नसले म्हणून काय झाले, पायाने पेपर लिहून बीएपर्यंतचे शिक्षण पुर्ण

विठ्ठल देशमुख | Mar 20, 2017, 09:43 AM IST

  • जालना: हात नसले म्हणून काय झाले, पायाने पेपर लिहून बीएपर्यंतचे शिक्षण पुर्ण
रेणुकाई पिंपळगाव-कितीही बिकट प्रसंग आला तरी डगमगता त्याचा सामना करायचाच अशी जिद्द ठेवून वाटचाल करणारे अनेक जण आपण पाहतो. भोकरदन तालुक्यातील करजगाव येथील चौरंगीनाथ लोखंडे हा त्यापैकीच एक. जन्मत:च दोन्ही हात नसलेल्या या युवकाने घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्दीवर बीए फायनलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

आता पुढे आणखी अभ्यास करून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून अधिकारी होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. रेणुकाई पिंपळगाव येथील कै. अण्णासाहेब देशमुख महाविद्यालयात सध्या विद्यापीठाच्या बीए अंतिम वर्षाची परीक्षा सुुरू आहे. यात चौरंगीनाथ हा युवक सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे. त्याचे कारण म्हणजे दोन्ही हात नसताना तो चक्क पायाने पेपर लिहितो आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेतही याच पद्धतीने पेपर लिहून तो इथपर्यंत पोहोचला आहे.

चौरंगीनाथ याचे वडील पंंढरीनाथ लोखंडे हे अल्पभूधारक शेतकरी. घरची परिस्थितीत अत्यंत बिकट, त्यातच शेती कोरवडवाहू आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे हा ध्यास घेऊन चौरंगीनाथ याने अपंगत्वावर मात करत ही मजल मारली आहे. शिक्षण घेत असतानाच तो वडिलांना शेतीकामात मदत करतो. परीक्षेत पायानेच पेपर लिहिताना त्याने दहावीत ४७ टक्के, तर बारावीत ६७ टक्के गुण मिळवले. आता सध्या तो बीए अंतिम वर्षाची परीक्षा देत आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आयएएस व्हायचे, असा निश्चय त्याने केला आहे.

घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच
चौरंगीनाथच्या घरची परिस्थिती बिकट आहे. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत अाहे. ्याने प्रतिकूल परिस्थितीत पुढील शिक्षण सुरू ठेवले. तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न त्याने बाळगले आहे. ही जिद्द पाहून रेणुकाईदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली आहे.

शेतीच्या कामातही मदत
शालेयजीवनापासूनच अभ्यासात हुशार असलेला चौरंगीनाथ वडिलांना शेतीच्या कामातही मदत करतो. बैलगाडी चालवणे, जनावरांना चारा-पाणी करणे ही कामे तो सहजपणे करतो. त्याशिवाय शेतीची इतर लहानसहान कामेही तो करतो. प्रत्येक काम आपल्याला करता आलेच पाहिजे, हा त्याचा निश्चय असतो. त्यातूनच त्याने अशी वेगवेगळी कामे करण्याचे कसब शिकून घेतले.

परिस्थितीला शरण जायचे नाही
मीरडण्यापेक्षा संघर्ष करण्याचे ठरवले. लहानपणी मुले मला हसायची. त्यामुळे अपमान वाटायचा. मात्र, शिक्षणाची आवड असल्याने कधीच खचलो नाही, त्यामुळेच बीए फायनलपर्यंत पोहोचू शकलो. परिस्थितीला शरण जाता परिस्थितीवर मात करायची, हा निश्चय केला आहे. आयएएस अधिकारी व्हायचेच, हे माझे स्वप्न आहे. चौरंगीनाथलोखंडे, दोन्ही हात नसलेला युवक

Next Article

Recommended