आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दिव्यांगांना शिक्षण, नोकरीतील आरक्षणासाठी पाठपुरावा करू- खासदार डॉ. सुनील गायकवाड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शरीर दिव्यांग असतानाही त्यावर मात करून अनेकांनी यशोशिखर गाठण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना यात आणखी साथ मिळावी म्हणून दिव्यांगांना शिक्षण व नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळावे म्हणून आपण संसदेत प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी येथे व्यक्त केला.  
 
येथील एसओएस बालग्राममधील दीक्षा गायकवाड या विद्यार्थिनीची दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी संघात निवड झाल्याबद्दल डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. गायकवाड बोलत होते. या वेळी एसओएस बालग्रामच्या प्रमुख वैष्णवी जोगळेकर, हरिभाऊ गायकवाड, दीक्षाचे प्रशिक्षक उदय गोजमगुंडे, बाबूराव बोडके आदींची उपस्थिती होती.
 
 
बातम्या आणखी आहेत...