आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांची धडपड: पाऱ्याचा तोरा, केळी, मिरचीला उन्हाची झळ; चारा अन् साडीचा पिकांना आधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागद - खान्देशमध्ये केळी हे मुख्य पीक आहे. केळी उत्पादनावरच परिसरातील शेतकऱ्यांची मदार आहे. परंतु यंदा उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली. परिणामी केळीचे पीक जोपासताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. केळीच्या पिकांना उष्णतेपासून बचावासाठी शेतकरी आता गिनीग्रास गवताच्या राशी भोवताली लावून बागांमध्ये थंडावा निर्माण करून झाडांची जपणूक करत असल्याचे चित्र आहे. 
 
शेतकरी केळी हे पीक दोन वेळा लागवड करतात. पहिले जून महिन्यात. त्यास मृग बाग, तर दुसरी लागवड ऑक्टोबरमध्ये, त्यास कांदे बाग म्हणून ओळखतात. मुख्य बाब म्हणजे मृग बाग हा जोपासताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. 

मृग बाग हा साधारणतः फेब्रुवारीच्या नंतर म्हणजेच एेन उन्हाळ्यामध्ये त्याचे घड निघण्यास सुरुवात होते. हे पीक मध्यम उष्णतेचे पीक आहे. परंतु मार्च महिन्यापासून सूर्य आग ओकत असून याचा परिणाम पिकावर होतो. 

उपाय योजना: उष्णतेपासूनबचावासाठी शेतकऱ्यांनी केळीच्या पिकाच्या चारही बाजूंनी गिनीग्रास जातीचे गावत लावले असून हे गवत उसाच्या बेटासारखे असते. त्यामुळे उष्णता केळीच्या बागांमध्ये शिरत नाही. 

नागद परिसरात सध्या उन्हापासून केळीच्या बागा वाचवण्यासाठी चाऱ्याचा आधार देण्यात येत आहे. 

- ४१ ते ४३ अंशसेल्सियस तापमान असल्याने कितीही पाणी दिले तरी केळी खोडालगत ओलावा राहत नाही.
- ३५ ते ४० लिटरपाणी केळीच्या एका झाडास लागते. उन्हाळ्यात यात ५० लिटरपर्यंत वाढ होते. 

- उन्हाच्या झळा केळीच्या बागांमध्ये घुसत असल्याने पाने सुकून गळून जाण्याचे प्रमाण उन्हाळ्यात वाढते. 
- केळीची वाढ उष्णतेमुळे खुंटते. यामुळे व्यापारी माल घेणे टाळतात. शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडते. 
 
- उन्हाळ्यामध्ये केळीला अधिक पाणी लागते. तसेच उन्हापासून केळीच्या झाडांचा बचाव करण्यासाठी गिनीग्रास घासचा वापर केळीच्या झाडांभोवती करावा यामुळे केळीला थंडावा मिळतो पाणीदेखील कमी लागते. 
-उदयसिंग शंकरसिंग भगत, प्रगतशील शेतकरी 
 
पुढील स्लाइडवर वाचा, आमठाणा परिसरात मिरची रोपांना झळा... 
 
बातम्या आणखी आहेत...