आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेरणा धरण पहिल्यांदाच ओव्हरफ्लो, अतिवृष्टीमुळे सात पाझर तलाव फुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद / लातूर/ बीड- परतीच्या पावसाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अक्षरश: कहर केेला आहे. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सात पाझर तलाव फुटले. बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनाही परतीच्या पावसाने तडाखा दिला. लातूर, नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती ओढविली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हेलिकॉप्टर व एनडीआरएसच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.

तुफान पावसामुळे मराठवाड्यातील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तेरणा धरण 2010 नंतर पहिल्यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तुळजापुरात ही मुसळधार पाऊस सुरु असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

दुसरीकडे, सोलापुरातील बार्शी तालुक्यात बहुतांश ओढ्यांना पूर आला आहे. परिणामी उस्मानाबाद-बार्शी वाहतूक विस्कळीत झाली आहे. बीडमधील पाटोदा परिसरात पहाटे मुसळधार पाऊस झाला. बिंदुसरा धरण तुडुंब भरले आहे.

लातुरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सास्तूर-गुबाळ, औसा-मुरूड, लातूर-उदगीर, निलंगा-उदगीर, औसा-मुरूड या मार्गावरील सव्वाशे बसेसच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या असून, या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प करण्यात आली होती.

बीडमधील मांजरा नदीकाठच्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा, नदी पात्रापासून लांब राहण्याचे आदेश, तर पारगाव घुमरा गावात पाणी शिरले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मराठवाड्यातील पूरस्थितीचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...