आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एड्सबाधित तरूण-तरूणी झाले विवाहबद्ध;‘नेटवर्क ऑफ हिंगोली बाय पीपल्स विथ एचआयव्ही’चा पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- दोघांचेदु:ख एकच, समोर मोठे आयुष्य पडलेले, परंतु ‘एड्सग्रस्त’ या एकाच नावामुळे सामाजिक पद्धतीने लग्नासाठी साथीदार मिळणे अवघडच नाही, तर जवळपास अशक्यच. परंतु येथील एड्सग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने जातीच्या भिंती तोडून दोन समदु:खी गरजवंतांना आयुष्याच्या मध्यावर लग्नबेडीत अडकवले असून त्यांच्या जीवनाची नवीन इनिंग सुरू झाली आहे.

कळमनुरी येथील अंकुश पाटील आणि वसमत येथील अश्विनी चनय्या (दोघांचीही नावे बदलली आहेत) हे दोघेही एचआयव्ही एड्सबाधित समाजाच्या निंदानालस्तीचा विषय झालेल्या व्यक्ती. दोघांनाही आयुष्याच्या एका वळणावर या असाध्य रोगाने पछाडले. एका एड्सबाधितासोबत अश्विनीचे लग्न झाले आणि पती निधनानंतर सासर आणि माहेरच्या प्रेमाला मुकुन तिच्या वाट्याला पुढील संघर्ष आला, तर अंकुशला वाईट संगतीमुळे हा रोग झाला आणि जीवनाची चवच गेली. सामाजिक पद्धतीने लग्न होणे शक्यच नसल्याने एकाकी जीवनाचा गाडा हाकला जात होता. येथील ‘नेटवर्क ऑफ हिंगोली बाय पीपल्स विथ एचआयव्ही’ या संस्थेशी या दोघांचाही संपर्क होताच. एकाकी जीवन जगणे अशक्य होत असून जगण्याचा कंटाळा आला असल्याचे सांगून अश्विनीने या संस्थेच्या अलका रणवीर यांच्यासमोर मन मोकळे केले. अलका यांनी अश्विनीची समजूत घालून धीर दिला लग्न करण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी अलका यांनी विवाहेच्छुक समदु:खी व्यक्तीचा संदर्भही दिला. अश्विनीने होकार देताच ऑगस्ट रोजी दोघांचेही संस्थेच्या कार्यालयातच छोटेखानी कार्यक्रम घेऊन शुभमंगल लावण्यात आले. दोघेही एकाकी जीवनाला कंटाळले होते. त्यांच्या जाती वेगवेगळ्या असूनही दु:ख एक आणि गरजही एकच असल्याने उर्वरित आयुष्य आनंदी करण्यासाठी दोघेही पुढील मार्गाला लागले आहेत. दोघांचा नव्याने संसार थाटण्यासाठी ‘नेटवर्क ऑफ हिंगोली बाय पीपल्स विथ एचआयव्ही’ या संस्थेने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. आतापर्यंत या संस्थेने असे जोडप्यांचे विवाह लावून दिले असून ते सर्व सुखी जीवन जगत आहेत.
बातम्या आणखी आहेत...