आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्ही बाधितांसाठी बालकांच्या हक्काकरिता आनंदवन संवाद यात्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी  - एचआयव्ही बाधितांचे मूलभूत प्रश्न ‘शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन’ या विषयावर सर्वसामान्यांसोबत संवादातून जनजागृती व्हावी, या उद्देशाने परभणी येथील डॉ. पवन सत्यनारायण चांडक यांनी दि. १८ व १९  फेब्रुवारी दरम्यान साकोली-गडचिरोली-आनंदवन जंगल भागातून २६०  किमीच्या अंतरात सायकलवरून केलेल्या प्रवासातून संवाद साधला.   
 

साकोली येथून शनिवारी (दि.१८) सुरू केलेला हा प्रवास सानगडी, लाखांदूर, वडसा, आरमोरी मार्गे गडचिरोली येथे मुक्कामी थांबला. रविवारी गडचिरोली येथून सायकलवर मूल, सावली, सोमनाथ, चंद्रपूर, भद्रावती  मार्गे आनंदवन वरोरा असा २६०  किमी प्रवास डॉ.चांडक यांनी पूर्ण केला.
 
समारोप त्यांनी आनंदवन प्रकल्पाचे थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्या आनंदवनात त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन केला. प्रवासादरम्यान त्यांनी विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांना भेट देऊन संवाद साधला. यात विशेषतः सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर (जि.भंडारा) येथील ११ वी व  १२ वीच्या  विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्सविषयी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला.
 
वडसा (जि. गडचिरोली) या ठिकाणी भारतीय स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पुढे जंगलातून मार्ग काढत आरमोरी गाठले. तेथे महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय व कॉलेज आरमोरी येथील विद्यार्थ्यांशी  सायकलिंग, सेवालयातील विद्यार्थी, जीवनरेखातील बालगृहमधील अनुभव, एचआयव्ही एड्स जनजागृती यावर संवाद साधला. 
बातम्या आणखी आहेत...