आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडे कुटुंबीयांची पोलिसांकडून पुनर्चौकशी, सुमित्रा यांच्या आई-वडिलांनाही बोलावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी सुिमत्रा होंडे यांच्या खुनाचा उलगडा दहा दिवस उलटूनही झालेला नाही. याप्रकरणात अटक केलेल्या विलास होंडे यांच्या पोलिस कोठडीत सुरुवातीला ७ व नंतर पुन्हा २ दिवसांची वाढ अंबड न्यायालयाने केली आहे. मात्र, तरीसुद्धा मुळ कारणांचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांनी गुरुवारी पुन्हा होंडे कुटुंबिय व मृत सुमित्रा यांचे आई-वडील विश्वंभर तारक यांच्याकडे पुन्हा चौकशी केली.
गेल्या सोमवारी दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान राहत्या घरात डोक्यात रिव्हॉल्वरने गोळी झाडल्यामुळे सुमित्रा होंडे यांचा मृत्यू झाला होता. चुलत दीर विलास होंडे याने सदरील खून केल्याची कबूली पोलिसांकडे दिली. यामुळे अंबड पोलिसांनी त्याला गुरुवारी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता, त्याची ७ दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला असता, पती सतिष होंडे यांना सांगून देईल असे सुमित्रा म्हणाल्या होत्या. 

यामुळे भितीपोटी झोपेत असलेल्या सुमित्रा यांच्या डोक्यात रिव्हॉल्वरने गोळी झाडल्याचे विलासने सांगितले होते. मात्र, दोन-तीन दिवस उलटल्यावर त्याने जबाब बदलण्यास सुरूवात केली. यात कुटूंबात चांगली वागणूक मिळत नव्हती. तुच्छ लेखले जात असत.
 
कुटुंबातील सर्वांनाच बोलावले 
खुनाचे खरे कारण जाणून घेण्यासाठी तपासाचा भाग म्हणून मृत सुमित्रा यांचे पती सतीश होंडे, दीर डॉ. भरत होंडे, जावू डॉ. सीमा होंडे, सासू-सासरे, आई-वडील तसेच अटक आरोपी विलासचे आई-वडील या सर्वांनाच गुरुवारी अंबड पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले होते. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांचे जबाब घेण्यात आले. मात्र, तरीसुद्धा खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे विलासने दिलेली कबुली याआधारेच पुढील तपास होणार आहे.
 
आज पुन्हा न्यायालयात नेणार
 आज पोलिस कोठडीची  मुदत संपली. पुन्हा अंबड न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने २ दिवसांची वाढीव कोठडी सुनावली होती. या २ दिवसांची मुदतही शुक्रवारी संपल्यामुळे दुपारी पुन्हा न्यायालयात हजर केले  जाईल. गुरुवार व शुक्रवारी माहिती तपासात निष्पन्न होईल, त्याअाधारेच न्यायालयात दोषारोपपत्र सादर होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...