आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक पुलावरून नदीत कोसळताना वाचला, गंगाखेड येथून रात्रीची अवैध वाळू वाहतूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेरणेच्या पुलावर भरधाव ट्रक कठड्यात अडकल्याने वाचला. - Divya Marathi
तेरणेच्या पुलावर भरधाव ट्रक कठड्यात अडकल्याने वाचला.
तेर - गंगाखेड येथून उस्मानाबादला वाळू घेऊन जाणारा ट्रक (टिप्पर) पुलावरून तेरणेच्या पात्रात पडता-पडता थोडक्याच वाचला. मंगळवारी (दि.०९) पहाटे सहाच्या सुमारास ही घटना घडली. 
उस्मानाबादेत बांधकामासाठी गंगाखेड येथून रात्रभर वाळू होते. मंगळवारी वाळू लादलेला भरधाव ट्रक (एमएच २५ एन ५४८५) गोरोबाकाका मंदिराजवळ पुलावरून तेरणा नदीपात्रात कोसळताना बचावला.
 
भेदरलेला चालक मुख्तार गणी शेख (रा. म्हाळंगी) याने ट्रकबाहेर उडी घेतली. सोलापूर येथून वाळू वाहतूक बंद असल्यामुळे गंगाखेड येथून अवैधरीत्या रात्रभर चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. गंगाखेड- उस्मानाबादला सरळ मार्ग असूनही पोलिस, महसूल प्रशासनाचा ससेमिरा चुकवण्यासाठी वाहनचालक आडमार्गाने येत असतात. ही वाहने तेर गावातून जात असल्यामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शासनाने ही चोरटी वाहतूक रोखण्याची मागणी तेर येथील ग्रामस्थांनी केली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...