आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी-बियाण्यांसह खुल्या बाजारातील वस्तू आता रेशनवर, रेशन दुकानांचे वाढणार उत्पन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - ग्रामीण भागातील धान्य खरेदीची व्यवस्था माेठ्या प्रमाणावर रेशन दुकानावर अवलंबून अाहे. याची कृषी व्यवस्थेला जाेड दिल्यास शेतकऱ्यांच्या अवाजवी खर्चाला कात्री बसेल  व गावातच बी-बियाणे उपलब्ध हाेतील, यासाठी राज्य शासनाने रेशन दुकानामध्ये बी-बियाण्यांसह खुल्या बाजारातील वस्तू विक्रीला परवानगी दिली अाहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह साडेसहा लाखांहून अधिक ग्राहकांना खुल्या बाजारातील वस्तू खरेदी करता येणार अाहेत.

रेशन व्यवस्थेमध्ये पारदर्शकता अाणण्यासाठी राज्य शासनाकडून नवनवीन याेजना जाहीर केल्या जात अाहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अवर सचिव सु. दे. बसवंत यांनी तीन मार्च २०१७ राेजी अध्यादेश काढला अाहे. बीड जिल्ह्यात वर्षभरापासून इलेक्ट्राॅनिक पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टिम अाणि बायाेमेट्रिक सिस्टिम सुरू हाेणार म्हणून गावपातळीवर घराेघरी जाऊन सर्वेक्षणाचे पुरवठा विभागाकडून काम सुरू अाहे.  कॅशलेस व्यवहारासाठी रेशन दुकानांवरही राेख पैसे वापराला अावर घालण्यासाठी  माेबाइलच्या माध्यमातून व स्वॅप कार्डच्या अाधारे व्यवहार  करण्याचे प्रशिक्षण जिल्हाभरात दिले जात अाहेत. अनेक रेशन दुकानदारांना ही प्रणाली व्यवहारात अाणण्यात अडचणी येत अाहेत. त्याच पुन्हा रेशन दुकानांमधून खुल्या बाजारातील वस्तू विक्रीला परवानगी व बी-बियाणे विक्रीस प्रारंभ हाेणार अाहेे.   यासाठी जिल्ह्यातील दाेन हजार ५९ रेशन दुकानदारांना  कृषी विभागाचा परवाना (लायसन्स) काढावे लागणार अाहे.

खुल्या बाजारातील वस्तूंना परवानगी : रेशन दुकानांमधून वितरित हाेणाऱ्या गहू, तांदूळसह खाद्यतेल पामतेल, कडधान्ये, डाळी, गूळ, शेंगदाणे, रवा, मैदा, चणापीठ व भाजीपाल्यासह अन्य खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री करण्यास शासनाने परवानगी दिली.
बातम्या आणखी आहेत...