आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यक्ष कामाची पाहणी न करता ग्रामपंचायतीत बसूनच बोगस कामांची चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज- पैठण येथे रोजगार हमी योजनेतील बोगस कामांची  एक महिन्याच्या आत चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश खुद्द रोहयोमंत्र्यांनी देऊनही चौकशीसाठी दोन महिने लागले. दरम्यान, रोहयो उपायुक्तांच्या समितीने शुक्रवारी  गावाला भेट दिली, पण प्रत्यक्ष कामाची पाहणी न करता ग्रामपंचायतीतच आजी-माजी ग्रामसेवकांची चौकशी करून कारवाईसाठी विभागीय आयुक्तांना अहवाल पाठवला आहे.
  
पैठण गावात दलित सुधार योजनेच्या निधीतून झालेल्या विविध विकासकामांमध्ये ग्रामपंचायतीने अपहार केल्याच्या तक्रारी रोहयोच्या विभागीय उपायुक्तांकडे गेल्यानंतर त्यांनी गंभीर दखल घेतली. रोहयोमंत्र्यांनीही या गावातील कामांप्रकरणी एक महिन्याच्या आत चौकशी करून कारवाई करा, असे आदेश दिले होते. परंतु चौकशीला दोन महिने उजाडले.  शेवटी बोगस कामांप्रकरणी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. 

समितीतील विभागीय आयुक्त कार्यालयाचे कार्यकारी अभियंता पी. एम. जाधव, बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे अभियंता एम. आनंदन यांनी गुरुवारी  सकाळी गावाला  भेट दिली, परंतु त्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाण्याचे टाळले. गावातील ग्रामपंचायतीतच तत्कालीन  ग्रामसेवक अरुण पोटभरे व सध्याचे ग्रामसेवक  कांबळे या दोघांना बोलावून  ग्रामस्थांसमोर त्यांची चौकशी केली.  

काय आहे प्रकरण  ? 
पैठण येथे २००८-९ मध्ये मंजूर झालेल्या भारत निर्माण योजनेचे काम अपूर्ण ठेवून  ग्रामपंचायतीने योजनेचे ५५ लाख रुपये उचलले होते. कामांची चौकशी सुरू झाल्याने केवळ लोकवर्गणीची रक्कम शिल्लक राहिली होती. रोहयोतून वाकडी ते ज्योतिबा मंदिर, पांडुरंग वस्ती ते ज्योतिबा मंदिर, चौधरी वस्ती ते पैठण बसस्थानक या रस्त्यावर बोगस मजूर लावले होते.  

निधीतूनही अपहाराचा प्रकार  
पैठण येथील सिंचन विहिरीची कामे बोगस करण्यात आलेली आहेत. यामध्ये सिंचनासाठी जुन्याच विहिरी दाखवण्यात आल्या असून  पंचवीस-पंधरा या हेडच्या निधीतूनही  अपहार करण्यात आला आहे.  
- संदीप चौधरी, तक्रारदार, पैठण
बातम्या आणखी आहेत...