आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववीची विद्यार्थिनी सृष्टीच्या कलाकृतीचे पंतप्रधानांकडून कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 परभणी - येथील बाल विद्यामंदिर शाळेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी सृष्टी संतोषकुमार चिद्रवार हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या आईचे काढलेल्या रेखाचित्राची दखल घेऊन पंतप्रधानांनी सृष्टीच्या या कलाकृतीचे कौतुक केले आहे. तशा आशयाचे पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. 
 
सृष्टीने पंतप्रधान मोदी यांचे मातृप्रेम पाहून प्रोत्साहित होऊन त्यांच्या आई हिराबेन यांचे रेखाचित्र काढून पाठविले. ड्राॅइंग शीटवर काढलेले ते रेखाचित्र मोदींना आवडले. त्यांनी सृष्टीच्या या कलाकृतीचे एका पत्राद्वारे कौतुक करताना आईचे आयुष्यात किती महत्त्व आहे, हे विशद करताना तिने पाठविलेले रेखाचित्र मी माझ्या आईला नक्कीच दाखवेल, असे सांगितले आहे. 
पंतप्रधान मोदींनी आपल्या दोन पानी पत्रात आयुष्यात आईचे महत्त्व, तिचा त्याग सांगितला आहे. 
जीवनात कलेचे महत्त्वही विशद करताना सृष्टीची कला पाहून आपल्याला आनंद झाल्याचे नमूद करीत रेखाचित्र काढण्याची कला तिने आयुष्यभर जोपासावी, असा सल्लाही दिला आहे. पंतप्रधानांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या या पत्राने सृष्टीच्या कलेचा गौरव शाळेनेही केला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...