आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीच्या पाण्यासाठी जल प्राधिकरणाकडे याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- एकीकडे वीज उपलब्ध असताना पोकळ वीज बिलासाठी वीज पुरवठा खंडीत करण्यासह शेतकऱ्यांचे पाणी देखील तोडण्याचा घाट भाजपा सरकारने घातला आहे, असा आरोप करीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते राजन क्षीरसागर यांनी जायकवाडी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे.  
जायकवाडी प्रकल्पात या वर्षी मुबलक पाणीसाठा असताना देखील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेशा पाणी पाळ्या मिळत नाहीत. बहुसंख्य शेतकऱ्यांना कालवे दुरुस्ती अभावी पाणीच मिळू शकणार नाही. जायकवाडी प्रकल्पाचा मुख्य कालवाच नादुरुस्त असल्याने   १२२ किलोमीटरवर २२०० क्युसेक क्षमते ऐवजी केवळ ९०० क्युसेक क्षमतेने चालविण्यात येतो. यामुळे डाव्या कालव्यावरील परभणी जिल्ह्यातील सुमारे ९७००० हेक्टर लाभक्षेत्रापैकी जवळपास निम्मे क्षेत्र कोरडवाहू ठेवण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...