आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरसकट कर्जमाफीसाठी आता जनजागरण यात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेंदूरवादा  - कर्जमाफीचा २८ जूनचा सरकारचा जीआर हा धूळफेक करणारा असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे, असा आरोप सुकाणू समिती सदस्य व किसान सभेचे राज्य सरचिटणीस काॅ. नामदेव गावडे यांनी केला. शनिवारी सावखेडा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.  
 
अध्यक्षस्थानी पंडितराव मुळे हे हाेते. तर कॉ. राम बाहेती, कॉ. गणेश कसबे  आदी उपस्थित होते. ते म्हणाले की,  सरकारचा शेतकरीविरोधी चेहरा उघडा पाडण्यासाठी राज्यभर १० ते २३ जुलैपर्यंत संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून केलेल्या संप, आंदोलनानंतर सरकारसोबत सुकाणू समितीची वारंवार चर्चा झाली. कर्जमाफीचे १४ जून व २८ जून रोजी काढण्यात आलेले जीआर हे सुकाणू समितीतील चर्चा व निर्णयाविरोधात असल्याचे म्हणाले. शासनाने काढलेला जीआर फसवा आहे. 
 
 समृद्धी महामार्गाविरोधात किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सर्व १० जिल्ह्यांत स्थानिक कृती समित्यासोबत केलेले आंदोलन, सरकारने वेळोवेळी बदललेली भूमिका, जमीन खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेले दरपत्रक आदी बाबींवर काॅ. गावडे यांनी प्रकाश टाकला.  
 
काॅ. प्रा राम बाहेती यांनीही या वेळी सरकारच्या धोरणाविरोधात व शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. प्राचार्य भाऊसाहेब अलोणे, काॅ. गणेश कसबे यांचीही या वेळी भाषणे झाली. जाहीर सभेनंतर कर्जमाफीच्या फसव्या जीआरची तसेच समृद्धी महामार्गसाठी जमीन खरेदीच्या दरपत्रकाची होळी करून निदर्शने करण्यात आली.
 
 सरकारची राज्यात दडपशाहीही सुरू आहे
 
ओडिशा राज्यातील जगन्नाथ पुरी येथे मागील महिन्यात झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचीही त्यांनी माहिती दिली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर विविध राज्यांत सध्या शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत, सरकारची दडपशाहीही सुरू आहे. याविरोधात २६ जुलै रोजी देशभर किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन गावडेंनी केले. 
बातम्या आणखी आहेत...