आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोलमजुरी करून बनवले ज्युदो चॅम्पियन, देशसेवा करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
जालना - परिस्थिती गरिबीची, वडील नाहीत, आई मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकते. या परिस्थितीशी सामना करीत  संजीवनी गंगतिवरेे या युवतीची राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवून नेपाळ येथे होणाऱ्या वर्ल्डचॅम्पियन स्पर्धेत खेळण्यासाठी निवड झाली. परंतु पैशाअभावी तिचे स्वप्न अपूर्ण राहणार होते. मात्र, सामाजिक बांधिलकीमुळे या गरजवंत युवतीला व्हॉट्सअॅपग्रुपच्या माध्यमातूनच २५ हजारांची मदत उभारली असल्यामुळे या मुलीला आता नेपाळमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन ज्युदो कराटे खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. 

भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथील संजीवनी गंगतिवरेे या मुलीचे वडील सहावीत असतानाच मृत्यू पावले. याशिवाय तिला दोन भाऊ, बहीण असल्यामुळे तिच्या आईलाच मोलमजुरी करून मुलांना शिकवावे लागत होते. या बिकट परिस्थितीची मैत्र मांदियाळी या फाउंडेशनमधील नागरिकांना माहिती होताच त्यांनीही यासाठी व्हॉट्सअॅपग्रुपवरून या मुलीच्या मदतीसाठी आवाहन केले. १५ ते १६ जणांनी या आवाहनाला प्रतिसाद देत मदत केली.

 दरम्यान, मुलीची शिकण्याची इच्छा पाहून सर्व शिक्षा अभियानाच्या नूतन मघाडे यांनी तिला भोकरदन येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात दाखल केले होते. 
 
देशसेवा करणार  
- घरच्या बिकट परिस्थितीमुळे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी मिळत आहे. मैत्र मांदियाळी यांच्या मदतीमुळेच हे शक्य झाले. आगामी काळात आयएएस होऊन देशसेवा करण्याचा मानस आहे. 
संजीवनी गंगतिवरे, कराटे खेळाडू.
बातम्या आणखी आहेत...