आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आष्टी : न्याय कक्षात छताचा तुकडा कोसळला, न्यायाधीशासह 4 वकील थोडक्यात बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
आष्टी  - आष्टी येथील प्रथमवर्ग दिवाणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कक्षात सोमवारी दुपारी काम सुरू असताना छताचा पंधरा किलोंचा सिमेंट काँक्रीटचा तुकडा कोसळल्याने न्यायाधीशासह कामकाज करत असलेले चार वकील थोडक्यात बचावल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता घडली. वकील संघाने तातडीची बैठक घेऊन या घटनेचा निषेध नोंदवला.
 
आष्टी येथील न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असून तात्पुरत्या स्वरूपात येथील जुन्या विश्रामगृहातील इमारतीत न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. १० जुलै रोजी दु. ३ वाजता आष्टीचे प्रथम वर्ग दिवाणी न्याय दंडाधिकारी एन. एन. धेंड यांच्या न्याय कक्षात कामकाज सुरू होते. या वेळी अचानक छतावरील सिंमेट काँक्रीटचा पंधरा किलो वजनाचा एक तुकडा न्यायाधीश धेंड यांच्या समोरील टेबलावर आदळला तेंव्हा न्यायाधीशासह वकील अविनाश निंबाळकर, दादामिया शेख, प्रशांत पवार, सय्यद असलम हे थोडक्यात बचावले.
बातम्या आणखी आहेत...