आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली: राज्यघटना समजण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांचे चरित्र वाचा, न्यायमूर्ती ता. वि. नलवडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली येथे जिल्हा न्यायालयाच्या  इमारतीचे भूमिपूजन न्या. नलवडे यांच्या हस्ते झाले. या वेळी मान्यवरांची उपस्थिती होती. - Divya Marathi
हिंगोली येथे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन न्या. नलवडे यांच्या हस्ते झाले. या वेळी मान्यवरांची उपस्थिती होती.
हिंगोली - राज्यघटना समजावयाची असेल तर छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचा. त्यामुळे घटना समजायला वेळ लागणार नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती ता. वि. नलवडे यांनी विधी अभ्यासक्रमात या महापुरुषांच्या चरित्राचाही समावेश करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते येथे रविवारी पार पडलेल्या जिल्हा न्यायालयाच्या पायाभरणी समारंभात बोलत होते.  

हिंगोली येथे सुमारे ३४ कोटी ५ लाख रुपये खर्चातून बांधण्यात येणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन न्यायमूर्ती ता. वि. नलवडे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ प्रस्तावित नवीन जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा भूमिपूजन व पायाभरणी सोहळ्याची सुरुवात न्यायमूर्ती ता. वि. नलवडे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करून कोनशिलेचे उद््घाटन करण्यात आले. या वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार बळीराम कोटकर, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक मोराळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी मु. श्री. जवळकर, जिल्हा सत्र न्यायाधीश ए. ए. बारणे, भारतीय विधी परिषद, नवी दिल्लीचे उपाध्यक्ष ॲड. सतीश देशमुख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे, हिंगोली वकील संघाचे अध्यक्ष शेख लाला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, वकील, लोकप्रतिनिधी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जी. पी. ढाले यांनी केले, तर वकील संघाचे अध्यक्ष शेख लाल यांनी आभार मानले. 
बातम्या आणखी आहेत...