आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कल्पना गिरी खून प्रकरण : किल्लारीकरच्या जामिनावरील सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - काँग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी खूनप्रकरणातील आरोपी समीर किल्लारीकर याच्या जामिनावरील सुनावणी २८ मार्च रोजी होणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी किल्लारीकरचे वकील आर. आर. देशपांडे यांनी युक्तिवाद करून जामिनाची मागणी केली होती. त्यानंतर न्यायाधीशांनी देान्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून गुरुवारी जामिनावर सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. परंतु आता सुनावणीची तारीख २८ मार्च देण्यात आली आहे.

गिरी खून प्रकरणातील अन्य आरोपी कुलदीपसिंग ठाकूर, श्रीरंग ठाकूर व प्रभाकर शेट्टी हे तिघे सध्या जामिनावर आहेत. मुख्य आरोपी महेंद्रसिंग चौहान, समीर किल्लारीकर व विक्रमसिंग चौहान यांना अद्याप जामीन मिळाला नाही. दरम्यान, या प्रकरणातील सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी न्यायालयात उपस्थित राहून या प्रकरणाची गतीने सुनावणी करण्याची विनंती न्यायाधीशांकडे केली.