आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीची नार्को टेस्ट करा, कल्पना गिरी खून प्रकरण, लातुरात कँडल मार्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपीची नार्को टेस्ट करून गिरी कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी करत विविध संघटनांच्या वतीने लातुरातील टाऊन हॉलच्या मैदानावर शनिवारी रात्री कँडल मार्च काढण्यात आला. गिरी खून प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी अगोदरच आरोपीच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. शिवाय सदर प्रकरणातील मुख्य आरोपी महेंद्रसिंह चौहान याने स्वत:ची स्वत:च्या खर्चातून नार्कोसह अन्य सत्यशोधक चाचण्या कराव्यात म्हणून न्यायालयाकडे अर्ज केला आहे, परंतु याप्रकरणी अद्याप पुढील सुनावणी झाली नाही. आरोपीची नार्को टेस्ट झाल्यास कल्पनाचा मृत्यू नेमका कसा झाला, तिचे किडनॅप झाले असेल तर ते कोठून झाले आदी प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी नार्को टेस्ट करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. आंदोलनात अयोध्या अग्रवाल यांच्यासह जवळपास १० ते १२ संघटनांचे कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...