आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिशीमुळे 50 लाख कर्ज फेडण्यासाठी अपहरण, पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
जळगाव - अमळनेर येथील डाॅ. निखिल बहुगुणे यांच्या मुलाचे ३ जानेवारी राेजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अपहरण झाले हाेते. मात्र, पाेलिसांनी लावलेल्या सापळ्यामुळे अपहरणकर्त्यांनी मुलाला ४ जानेवारीला पहाटे साेडून दिले हाेते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेर शहरातील ५ अाणि बडाेदा येथील एक अशा सहा संशयिताना अटक केली अाहे.  भिशीमुळे झालेल्या ५० लाखांच्या कर्जामुळे हे अपहरण केल्याची कबुली त्यांनी पाेलिसांना चाैकशीत दिली.     

अमळनेर येथील डाॅ. बहुगुणे यांचा मुलगा पार्थ (वय १२) याचे ३ जानेवारी राेजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ग्लाेबल हायस्कूल जवळून अपहरण केले हाेते. याबदल्यात अपरहणकर्त्यांनी ५० लाख रुपये खंडणीची मागणी केली हाेती. दरम्यान, अपहरणकर्त्यांचे एन्काऊंटर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढताच भीतीपोटी अपहरणकर्त्यांनी मुलाला सोडून दिले होते. मात्र मुलाच्या सुटकेनंतरही पाेलिसांनी अाराेपीचा शाेध कायम ठेवला. मुख्य सूत्रधार महेश विनायक खांजाेडकर (बारी, वय ३३, रा. बालाजीपुरा, अमळनेर), सुनील वामन बारी (वय ३६), भरत दशरथ महाजन (वय २४), शिवम गुलाब शिंगाने (वय १९), अनिल नाना भील (वय २०, सर्व रा. अमळनेर), भटू हिरामण बारी (रा. बडाेदा, गुजरात) यांना अटक करण्यात पाेलिसांना यश अाले. 
 
भिशीमुळे कर्जाचा डाेंगर...
अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश हा बांधकाम मटेरिअल सप्लायर्सचे काम करायचा. २०१५ मध्ये त्याने  मिनलर वाॅटरचा प्लान्ट टाकला. तसेच ताे भिशीही चालवत हाेता. त्यात त्याला पुरुषाेत्तम बाेरसे नावाच्या व्यक्तीने त्याला १८ लाखांत फसवले.  तसेच दाेन जणांनी प्रत्येकी अडीच लाखांना गंडा घातला.  त्यामुळे महेश याच्यावर ४० ते ४५ लाखांच्या कर्जाचा डाेंगर झाला. तसेच दाेन महिन्यांपूर्वी भटू बारीचे वडील वारल्याने ताे बडाेदा येथून अमळनेर येथे अाला. त्याच्यावरही ७ ते ८ लाखांचे कर्ज हाेते. त्यामुळे दाेन्ही कर्जबाजारींनी या संकटातून बाहेर पडण्यासाठी अपहरणाचा मार्ग शाेधला. यासाठी  डाॅ. बहुगुणे यांच्या मुलाचे अपहरण करण्याचा कट रचला हाेता, मात्र पाेलिसांनी ताे उधळून लावला.