आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारजच्या मंदाबाईचे कन्यादानानंतर किडनी दान, यशस्वी शस्त्रक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज - अाधुनिकीकरणाच्या युगात नातेसंबंध कमकुवत होत असताना यातील दुरावाही वाढला असून अशातही महिलेने कन्यादानानंतर जावयास किडनी दान करून समाजासमोर नातेसंबंधांचा एक आदर्श ठेवला आहे. वैजापूर येथील एका महिलेने आपल्या मुलीचे कुंकू वाचवण्यासाठी जावयास किडनी दान केली असून एमजीएम रुग्णालयात ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून रुग्ण सुखरूप आहे.   

मोलमजुरी करणाऱ्या रामहरी सोनवणे (२८, रा. बहिरगाव, ता. कन्नड) यांचा विवाह गारज येथील सुनील शेळके यांची मुलगी वैशाली हिच्याशी २००७ मध्ये झाला. शेतकरी असलेले रामहरी यांना दोन मुले आहेत. काही दिवसांपूर्वी उलट्या, चक्कर येणे, अपचन होणे अशा शारीरिक व्याधींनी ते ग्रासले होते. त्यांनी आयुर्वेदिक उपचार केले, परंतु काहीही फरक पडला नाही. त्यांनी अखेर एमजीएम गाठून तपासण्या केल्या. तेव्हा त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी असल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यानंतर या कुटुंबीयांवर संकटाचा डोंगरच कोसळला. रामहरीच्या आई व भावाने किडनी देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु त्यांची किडनी जुळत नव्हती. रामहरी यांच्या सासू मंदाबाई शेळके (४७) यांनी मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपली किडनी देण्याची तयारी दर्शवली. डॉक्टरांनी तपासणी करून किडनी मॅच होत असल्याचे निदान केले. ४ मार्च रोजी एमजीएम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. दोन्ही रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचे एमजीएमचे डॉ. सुधीर  कुलकर्णी यांनी सांगितले.   
 
बातम्या आणखी आहेत...